web-ads-yml-728x90

Breaking News

बुडलेलं घर आणि मोडलेलं संसार उभा करा......!

 

स्वातंञ्याच्या पुर्वी पासून पुरहाणी चालत आली आहे.निसर्गावर कोणाचाही चालत नाही किंवा राजकारण्याच्या आश्‍वसनावर निसर्ग लोळत नाही परंन्तु गांव शहरे नदया नाले बंधारे धरणे याचे नियोजन करण सरकारच काम आहे त्याकडे प्रत्येक वर्षी दुर्लक्ष होतंय याला जबाबदार कोण हे प्रत्येक पुढारपणानी ठरवलं पाहिजे.पुर्वी एका गावात पाच घरे होती कुठे दोन होती कुठे दहा घरे होती आज त्याची संख्या 25 घरापासुन 200 ते 500 आणि शहराची घरसंख्या हजारोनी झाली आहे.एकशे 32 कोटी लोकसंख्याची नोंद जुनाच पाढा वाचला जातो मग त्या लोकसंख्येत वाढ झाली नसेल का र्‍केवळ आकडे वारी आणि उन्हाळा पावसाळा त्यात राजकारणाचा आरोप प्रत्यारोप मसला सुरू आहे त्यामध्ये पावसाळयाचा पुरहाणी नियोजन झाले पाहिजे.

  उन्हाळयात कोटी रूपयाची ठेकेदारी करून टक्केवारी कमाई कमवणार्‍याचे विकास कामे पावसाळयात धुवून जातात रस्ते गटारी पुरहाणी शेती दरवर्षीचा खेळखंडोबा त्यात एक हजार पासुन दहा हजार भरपाई हाच आश्रृचा बांध बांधला जातोय यावर सरकारने राजकारण न करता उपाय शोधला पाहिजे.आज ज्याचं घर मोडलं ज्याचं संसार बुडालं त्या कुटुंबाची झालेली हाणी दौरेखोराची पहाणी दौरा न होता स्वताची मदत झाली पाहिजे.सरकारची भरपाई ही खर्‍या जनतेच्या करातुन घेतलेली कमाईची भरपाई आहे  

       मात्र प्रत्येक लोकप्रतिनिधी नेतेगिरी करणार्‍यानी ज्यांच्या जवळ आमाप संपत्ती आहे त्यांनी गांवे शहरे कुटुंब दत्तक घेवुन विकास केला पाहिजे त्या कुटुंबाना उभे केले पाहिजे मात्र लाखोचा नुकसान झालेले कुटूंब दहा हजारात कसा उभा राहिल यासाठी राज्य आणि केंन्द्र सरकारने प्रत्येक छोटया मोठया व्यवसायीकाना 10 ते 25 लाखाचा बिनव्याजी कर्ज दिला पाहिजे त्यामध्ये त्यांना 10 वर्षाची मुदत फेड देवुन 40 ते 50 टक्के अनुदान दिले पाहिजे तरच उध्दवस्त झालेले दुकाने मोडलेली घरे उघडयावर आलेला संसार उभा राहिल.ज्या ज्या ठिकाणी पुरहाणीत कुटूंब बाधीत झाले शेती नुकसान झाले दुकाने उध्दवस्त झाली त्यांना एक वर्षे शिक्षण विज पाणी घरपट्टी शेतसारा सरकारने माफ केले पाहिजे त्यांना विमा कंपन्यानी भरपाई दिली पाहिजे तरच दौर्‍याचा सार्थक होईल.  

   दरवर्षी घटना घडल्यावर चिंता व्यक्त करून मदतीचा हात दिला जातो मात्र शहरात गावात येणार्‍या पाण्यावर कायमचा तोडगा काढला जात नाही पुर्नवसन प्रक्रिया डोंगर कोसळण्यावरच का दिसतोय डोंगरात वस्ती वाढतात का  दिसत नाही नदीपात्रा शेजारी बांधकामे होताना मातीभराव होताना का दिसत नाहीत अनेक धरणे बंधारे उभे राहात आहेत मात्र धरणाचे पाणी पावसाळयात दरवर्षी जातो त्यावर तोडगा काढला जात नाही.राज्य कोणीही चालवलं तरीही निसर्गाचा कोप थांबणार आहे का ? पाऊस पडायाचा तो पडणारच आहे.रस्ते पुल डोंगर धरणाखालची शेती गांवे याचा दरवर्षी पावसाळयापुर्वी ऑडीट झालं पाहिजे मात्र आमच्यात राजकीय स्पर्धा सुरू आहेत त्यामुळे ज्याचं जीव गेलेत त्यांना भरपाई देवुन आश्रृ आवरणार आहेत का ?याकडे माणुसकीच्या नात्याने सार्‍यानी पाहिले पाहिजे.आज पुरहाणीत लहान बालके त्यांच्या शिक्षणाचे साहित्य आवडीचं शिक्षण आणि कुटुंबाची गरीबी आपल्या सार्‍याच्या जीवाळयाचा प्रश्‍न आहे. 

      त्यांना मदतीचा हात संपुर्ण महाराष्ट्रातुन दिला जातोय अशा माणुसकीला सलामच आहे.मात्र बुडलेलं घर आणि मोडलेलं संसार उभा करण्यासाठी सरकारच्या विविध योजना घरे पुर्नवसन उद्यौग व्यवसायासाठी बिनव्याजी अनुदानीत कर्ज मोफत शिक्षण करमाफी अन्न धान्य भातबियाणे शेतीयंत्र उपयुक्त सोयीसुविधा राज्य आणि केंन्द्र सरकारने देणे गरजेचे आहे.

 

नामदेवजी शेलार (संपादक)

 

No comments

satta king