web-ads-yml-728x90

Breaking News

राज कुंद्रावरील आरोपानंतर जीवे मारण्याची धमकी, अभिनेत्री सागरिका सुमनची पोलिसात तक्रार

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा आरोप मॉडेल-अभिनेत्री सागरिका सुमन (Sagarika Shona Suman) हिने केला आहे. सागरिकाने मुंबईतील ओशिवारा पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे. फोन कॉल्स, इंटरनेट आणि इतर माध्यमातून धमकी दिली जात असल्याचा दावा तिने केला आहे. राज कुंद्राने (Raj Kundra) न्यूड ऑडिशनची मागणी केल्याचा आरोप करत सागरिकाने त्याच्या अटकेची मागणी केली होती.सागरिका सुमनने काय आरोप केला होता?सागरिका सोना सुमनने आपल्यालाही वाईट अनुभव आल्याचं सांगितल्याचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. “मी सागरिका सोना सुमन. हे अश्लील चित्रपटांचं एक मोठं रॅकेट आहे. यामध्ये बड्या लोकांचा सहभाग आहे. राज कुंद्रा यांचं नाव समोर आलं आहे. लॉकडाऊनच्या काळात मलाही एक वाईट अनुभव आला होता. ऑगस्ट 2020 मध्ये मला एका वेब सीरीजमध्ये काम करण्याची ऑफर आली. मी होकार दिल्यावर राज कुंद्राच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर उमेश कामत यांचा मला फोन आला. माझी ऑनलाईन ऑडिशन घेण्याचं ठरलं. मी व्हिडीओ कॉल जॉईन केल्यानंतर माझ्याकडे नग्न ऑडिशन देण्याची मागणी केली. मला धक्का बसला, आणि मी नकार देत कॉल बंद केला,” असा दावा अभिनेत्री सागरिका सोना सुमन हिने केला होता.या व्हिडीओ कॉलमध्ये तिघे जण होते. त्यापैकी एकाचा चेहरा झाकलेला होता, तर एक बहुतेक राज कुंद्रा होता. जर तो यात सहभागी असेल, त्याला अटक करुन या रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणीही सागरिकाने केली होती.

No comments