पुरग्रस्त गांवासाठी साईबाब मित्र मंडळ विरार मदतीसाठी पुढे सरसावले
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – विरार
महाड तालुक्यातील तळीये तेथे दरड कोसळून अनेक कुटुंब उध्वस्त झाली तर अनेक नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला.अद्यापही शोधकार्य सुरू असून काही नागरिक बेपत्ता आहेत.यात अनेक कुटुंब जमीनदोस्त झाली आहेत.अद्यापही नागरिक बेपत्ता आहे येथील नागरिकांवर या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी काही काळ लागणार आहे.राज्य सरकारसह सामाजिक संस्था देखील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत.याच दरम्यान आता विरार येथील साईबाब मित्र मंडळ आणि प्रफुल्ल साने,दत्ता साने यांनी मिळून पुरग्रस्त गावातील नागरिकांनसाठी 53 अन्न धान्याची पाकीट मदत म्हणून नाही तर आपले कर्तव्य म्हणून दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.नेहमी महाराष्ट्रातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रफुल्ल साने,दत्ता साने व साईबाब मित्र मंडळ त्यांचे सर्व सहकारी,पदाधिकारी नेहमी तत्पर असतात असतील असे यावेळी साईबाब मित्र मंडळाच्या पदाधिकारी सहकार्यानी ‘युवा महाराष्ट्र लाईव्ह’ न्यूजशी बोलताना सांगितले.
No comments