आदिवासींच्या खाद्यतेलात कोट्यवधीचा भ्रष्टाचार, श्रमजीवी संघटनेचा आरोप
BY - युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे
ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येलाच आदिवासींच्या हक्काच्या खावटीमधून खाद्यतेल आणि मसाला हडपण्याचा संतापजनक प्रकाराचा पर्दाफाश श्रमजीवी संघटनेने केला आहे. आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी विकास महामंडळ यांच्या मार्फत सद्या खावटी किटचे वाटप सुरू आहे. या वाटपात 12 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू वाटपाची घोषणा शासनाने केली. मात्र, प्रत्यक्षात यातील 1 लिटर खाद्यतेल गायब आहे. आज श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भिवंडी तालुक्यातील संत गाडगेबाबा आश्रम शाळेत असलेले खावटी वाटप होत असताना अचानक भेट देऊन हा प्रकार उजेडात आणला. श्रमजीवीचे प्रमोद पवार यांनी या पॅक किटला ऑन कॅमेरा अनपॅक करत यात असलेल्या वस्तूचा पंचनामा केला. खावटी वस्तूच्या केंद्रीय खरेदीत तब्बल 70 कोटी रुपयांचा घपला करणाऱ्या आदिवासी विकास विभाग आणि महामंडळाने आता खाद्यतेल पळवून आणखी 20 कोटी खिशात घातले असल्याचा आरोप यावेळी श्रमजीवीने केला आहे.
No comments