पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत ‘पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण’ उपक्रमाचा समारोप
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
कर्नाळा व फणसाड अभयारण्य येथे येणाऱ्या पर्यटकांना अभयारण्यातील महत्त्वाच्या स्थळांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मिळावे, पर्यटन मार्गदर्शक म्हणून स्थानिक आदिवासी तरुण-तरुणींना प्राधान्याने रोजगार उपलब्ध व्हावा, या संकल्पनेतून पर्यटक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या संकल्पनेला यश मिळाल्यास भविष्यात दुसरीकडेही या संकल्पनेची पुनरावृत्ती करता येईल आणि पर्यटक मार्गदर्शकांना भविष्यात वेळोवेळी अद्ययावत प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून ते अधिक सक्षम होतील, असे प्रतिपादन पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी येथे केले.
रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य व फणसाड अभयारण्य परिसरातील स्थानिक आदिवासी समाजातील बेराजगार युवक-युवतींना राष्ट्रीय पातळीवरील गाईड निर्माण करणाऱ्या ग्वाल्हेर येथील “आयआयटीटीएम” या भारत सरकार मान्यताप्राप्त संस्थेमार्फत दि. 02 ते 06 ऑगस्ट 2021 या कालावधीत देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा समारोप कार्यक्रम पनवेल येथील कर्नाळा पक्षी अभयारण्य येथे संपन्न झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी पर्यटन संचालनालय (DoT) कोकण विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे, ठाणे वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, सहाय्यक वनसंरक्षक फणसाड नंदकिशोर कुप्ते, ट्रेनिंग हेड योगेश निरगुडे, कर्नाळा अभयारण्य परिक्षेत्र वनाधिकारी प्रदीप चव्हाण, फणसाड अभयारण्य परिक्षेत्र वनाधिकारी श्री. भोसले तसेच कर्नाळा व फणसाड अभयारण्यातील कर्मचारी वृंद उपस्थित होते.
No comments