web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाडचा सहाय्यक वनरक्षक मुंबई एसीबीच्या जाळयात कार्यालयात साडेबारा लाख मग घरात किती असतील

BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

ठाणे नियोजन विभागाच्या अधिकार्याला निधी उपलब्धेसाठी टक्केवारीचे पैसे देणे आहेत त्यासाठी कनिष्ठ अधिकार्याकडे लाचेची मांगणी करणार्या मुरबाड ठाणे वनविभागाचे अधिकारी बळीराम तुकाराम कोळेकर यांना मुंबई एसीबी ने रंगेहात अटक केली आहे.

मुरबाड टोकावडा येथे जंगलाचे संरक्षण रोपाची लागवड इतर कामासाठी निधी मंजुर करण्यासाठी सदरची रक्कम ही ठाणे जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंदारे यांना देयाची आहे असे सांगुन एवढी मोठी रक्कम कशी देणार म्हणुन तेथील कनिष्ठ अधिकार्याने थेट मुंबईचे एसीबी कार्यालयात तक्रार केली पोलिसानी चौकशी अंती सापळा रचून बळीराम तुकाराम कोळेकर याला रंगेहात पकडला त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्या कार्यालयातच 12 लाख 46 हजाराची रोख रक्कम सापडली .मुरबाडचे वन साबां अधिकारी रडारवर असल्याची चर्चा आहे.मुंबई एसीबी बळीराम तुकाराम कोळेकर यांच्या सर्व संपत्तीची चौकशी करत असुन ठाणे जिल्हा नियोजन समितीचे टक्केवारी अधिकारी अमोल खंदारे मुरबाड वनविभागाचे टोकावडा पुर्व पश्चिम मुरबाड उत्तर दक्षिण तसेच सहाय्यक वनअधिकारी तुळशिराम हिरवे यांच्या संपत्तीची तसेच त्यांच्या ठेकेदारी कामाची ही चौकशी करावी अशी मांगणी स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी केली आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार
त्याचप्रमाणे अमोल खंदारे हे डीपीडीसी ठाणे जिल्हा नियोजन अधिकारी असुन मुरबाड तालुका सार्वजनिक बांधकाम विभागाचा निधी देतानाही टक्केवारी घेतात सा.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता टोटावाल मुरबाडचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाल शाखा अभियंता औसरमाल यांचा संबध निधी उपलब्धेसाठी अमोल खंदारे यांच्याशी येतो त्यासर्वाची चौकशी एसीबी मार्फत शासनाने करावी अशी मांगणी नामदेव शेलार यांनी केली आहे.या वनविभागाच्या कामाची माहिती आम्ही माहिती अधिकार कायदर्यांतर्गत मागितली होती मात्र देण्यात आली नाही.वनविभागाच्या भ्रष्टाचाराविरोधात निर्भिड लेखणी चालवली लोकआयुक्ताकडे तक्रार केली मात्र त्याची चौकशी करण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकारी यांच्या सोबत अमोल खंदारे सुध्दा होते.पर्यटन कामाचे ठेकेदार वनअधिकारी सार्वजनिक बांधकाम अधिकारी सत्यजित कांबळे शाखा अभियंता आल्टे सारे येवुन गेले टक्केवारीचा घोळ अधिक वाढल्याचे समोर येत आहे.

    ग्रामीण रूग्णालयाच्या दुरूस्ती कामामध्ये सुध्दा अमोल खंदारे यांनी पाच टक्के रक्कम दिली नव्हती तोपर्यंत निधी उपलब्ध करून दिला नव्हता रोख रक्कम दिल्यावर सन 2018 मध्ये तात्काळ पत्र दिले होते तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्याने आमच्या समोर टक्केवारी रोख घेतली होती याचे आम्ही साक्षीदार आहोत.

   ग्रामीण रूग्णालय मुरबाड टोकावडा तसेच कोव्हीड कालावधीत ग्रामीण रूग्णालयातील रस्ते पत्राशेड विश्रामगृह दुरूस्ती वन हुतात्माचौक अशा अनेक कामाची टक्केवारी ऑक्सीजन पार्क बागेश्वरी तलावातील बोट अशा कोटीच्या कामाची टक्केवारी अमोल खंदारे यांना दिली असेल का याचीही चौकशी मुख्यमंत्री गृहमंत्री उपमुख्यमंञ्यानी करावी अशी मांगणी स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी केली आहे.

   एसीबी सीआयडी तसेच सीबीआय इडीने ठाणे जिल्हा नियोजनातुन सन 2018 पासुन 2021 पर्यंत सगळया कामावर वाटप झालेल्या निधीची चौकशी केल्यास 100 कोटीच्यावर निधीची टक्केवारी घोटाळा उघडकीस येईल परंन्तु सर्व पक्षीय ठेकेदाराचे संबध नियोजन विभाग वनविभाग सा.बां.विभाग याच्याशी असल्याने हा भ्रष्टाचार कारवाई फार काही उघड होईल असा वाटत नाही.

  मोठे मोठे लोकप्रतिनिधी मंत्री याच्या आदेशाने कामे करणारे हे अधिकारी लाच घेणे सोडणार नाहीत सरकार सुध्दा त्याकडे दुर्लक्ष करेल विरोधीपक्ष मोर्चे आंदोलने करणार नाहीत अशी चर्चा सर्वत्र केली जात असुन सर्वसामान्य जनता आम्हा सर्वाची सरकार एसीबीला विनंती आहे की ठाणे ते मुरबाड पर्यटनच्या सर्व अधिकारी सर्व विभागाची कामे मंजुर वितरीत निधी याची योग्य चौकशी करून कारवाई  करतील असा विश्वास सुध्दा आम्हाला आहे. 

 

No comments