मुरबाडच्या वनविभागात कोटीचा भ्रष्टाचार वनजमिनवर अतिक्रमण केंन्द्रानी कारवाई करावी - नामदेव शेलार
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे
आजपर्यंत वनविभाग निसर्गरम्य पर्यावरणाचे निर्माते वनाचे संरक्षण वृक्षाचे पालनहारते पर्यावरणाचे प्रेरणेते वाटत होते मात्र आता हेच वनअधिकारी कर्मचारी वृक्षतोडीचे साथीदार ठेकेदाराचे टक्केवारी दलाल वनजमिनी अतिक्रमाणाचे भागीदार भ्रष्टाचाराचे महामेरू कारवाईचे दिखावू बनले असल्याचे मुरबाड तालुक्यात समोर आले आहे.
निसर्गाशी प्रामाणिक राहून वनाची सुरक्षा करण्याची शपथ ग्रहण केलेले आजचे वनअधिकारी लाकुडचोर ठेकेदार अतिक्रमण धारक यांचे सहकारी बनले आहेत राजकारण्याचे आदेशाचे पालन करून लाखो वृक्षाना श्रध्दांजली देणारे हाळु हाळु शासनाच्या निधीत डल्ला मारण्यासाठी ठेकेदारीत भागिदारी बनले आहेत.वनजमिनीवर अतिक्रमण करणार्याना हाताशी धरून अतिक्रमण जमिनीचे पार्टनर बनले जात असल्याची चर्चा आहे हे वास्तव्य खरे आहे मात्र त्याची चौकशी निबंकलक अधिकार्यानी केल्यास पुरावे समोर येतील यासर्व प्रकाराची चौकशी करून कारवाई करावी अशी लेखी मांगणी स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी केली आहे.
ठाणे जिल्हयात वनजमिनीवर हजारो एकरावर अतिक्रमण आहेत मात्र कारवाई आदिवासी गोरगरीबावर होते ज्यांनी रानमाळ जंगल जमिनी अतिक्रमणात ताब्यात घेतल्या आहेत त्याच्यावर कारवाई होत नाही नुसतं कागदावर कारवाई घोडे नाचवुन भागीदाराला वाचवून पैसे कमवण्याचा धंदा सुरू आहे अशा मुरबाड तालुक्यातील सर्व वनजमिनीवर अतिक्रमणे असणार्यावर कारवाई केली जात नाही केवळ गुन्हे दाखल करून जमिनी जागा ताब्यात घेतल्या जात नाहीत त्यावरील फार्महाऊस उध्दवस्त केले जात नाहीत असे प्रकार म्हसा,घोरले,मुरबाड,टोकावडा, धसई,असोसे सह सर्वत्र आहेत त्याला मुरबाड उपविभाग वन अधिकारी मुरबाड पुर्व पश्चिमचे तसेच टोकावडा उत्तर दक्षिणचे वनअधिकारी कर्मचारी जबाबदार आहेत
दरवर्षी वृक्षलागवड बांध बंधारे पर्यटन निवास्थाने दुरूस्ती सामाजिक वनीकरण नर्सरी सभागृह यासाठी निधी उपलब्ध करून त्यांची टेंडर मॅनेजकरून मुरबाडचे वनअधिकारी ठेकेदारी करत आहेत काही कोटीची कामे थातुरमातुर लाखात करून कोटीचा डल्ला मारणार्या मुरबाड पुर्व पश्चिम टोकावडा उत्तर दक्षिण विभागाच्या अधिकार्यावर केंन्द्र शासनाने निलंबनाची कारवाई करावी अशी लेखी मांगणी स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेवजी शेलार यांनी केंन्द्रीय वनमंञ्याकडे केली आहे तसेच मुरबाड बागेश्वरी तलाव सुशोभिकरण पर्यटनस्थळ याची ठेकेदारी टक्केवारीत वनअधिकारी भागीदार असल्याचे संशय असुन त्या कामाची निधीची टेंडर मॅनेजची चौकशी करावी अशी मांगणी नामदेवजी शेलार यांनी केली आहे.
No comments