पडघा शहरात शासकीय गुरचरणीत अनाधिकृत बांधकामे ;संबधित यंत्रणा लाचखोरीने गप्प
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – पडघा, भिवंडी
भिवंडी तालुक्यातील पडघा शहरात शासकीय गुरचरण जागेत बिल्डर्स माफीयानी अनाधिकृत व्यापारी गाल्याचे बांधकाम केले आहे.त्याची तक्रार काँग्रेस नेते गोपीनाथ पाटील यांनी केली आहे.
महसुल जागेत पडघा ग्रामपंचायत तसेच तळवली ग्रामपंचायत यांची सदरहू असुन त्या शासकीय जागेत अवैधव्यापारी गाले बांधुन लाखो रूपायाने विक्री होत आहे न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे त्याकडे महसुल विभाग ग्रामपंचायत विभाग दुर्लक्ष करत असुन शासनाने त्यावर कारवाई करावी अशी मांगणी काँगे्रस जेष्ठ नेते गोपीनाथ पाटील यांनी केली आहे.
महसुल विभागाशी संपर्क केला असता इकडून तिकडुन टोळवाटोळची उत्तरे दिली.भिवंडी तालुक्यात शासकीय जमिनीवर ग्रामपंचायत स्तरावर मोठया प्रमाणात अतिक्रमणे करून माफीयानी कोटी रूपये कमवले असुन लाचखोर अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करून तक्रारदाराच्या तक्रारीचे आहवाल शासनाला खोटे पाठवतात सरकारने पारदर्शक दाखवुन तात्काळ कारवाई करावी अशी मांगणी होत आहे.
No comments