मुरबाड ग्रामीण रूग्णालयातील डॉ.वाटोरे यांच्यावर कारवाई करा सेक्युलर नेते रविंद्र चंदने यांनी दिला आंदोलनाचा इशारा
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे
गोवेली ग्रामीण रूग्णालयातुन मुरबाडला सिर्जरसाठी आणलेल्या गरोदर मातेच्या मुलाचा अपुर्या यंत्रणा डॉ.वाटोरे व त्याच्या सहकार्याचे दुर्लक्षाने तिसर्या दिवशी मृत्यु झाला त्याला मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे डॉ.वाटोरे हेच जबाबदार असुन त्यांच्यावर शासनाने कारवाई करावी यासाठी ठाणे जिल्हा युवा सेक्युलर नेते रविंद्र चंदने यांनी आंदोलनाचा लेखी पत्राव्दारे इशारा दिला आहे.
स्वप्नज्योती टाईम्स व युवा महाराष्ट्र लाईव (YML NEWS) टिव्ही चॅनेल मधुन प्रकाशित झालेल्या बातम्याची दखल घेवुन सेक्युलरनेते रविंद्र चंदने यांनी सदर इशारा दिला आहे.ठाणे सिव्हीलसर्जन यांना लेखी पत्रव्यवहार करून डॉ.वाटोरे व त्यांच्या सहकार्यावर कारवाईची मांगणी केली आहे.मुरबाड ग्रामीण रूग्णालयात अपुर्या सुविधा बाळरोगतज्ञ नसताना तसेच गोवेलीचा रूग्ण सेन्ट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथे पाठवण्याची गरज असताना डॉ.वाटोरे यांनी मुरबाडला का आणले
मुरबाड ग्रामीण रूग्णालयात डॉ.वाटोरे यांचा मनमानी कारभार सुरू असुन शासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
No comments