web-ads-yml-728x90

Breaking News

भिवंडीचा दगडखाणी रॉयल्टीचोरी चालक मालक कोण...? ;100 कोटीची मालमत्ता शासनाकडुन दुर्लक्ष पुरावे आहेत पण कारवाई नाही

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – भिवंडी

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयार्तगत येणाऱ्या भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील तात्काळ उपविभागीय अधिकारी डॉ।मोहान नळदकर  यांच्या मनमानी भ्रष्ट गैरकारभाराची चौकशी  महाविकास अघाडी सरकारने गुलदस्त्यात ठेवले आहे. भिवंडी तालुक्यातील भादाणे पिसे वाशेरे तळवळी आतकोली ग्रामपंचायतीच्या भादाणे तळवली पठार गुरचरणीवर 100 कोटीच्यावर दगडखाणी रॉयल्टी चोरी करणाऱ्यावर शासनाने अद्यापही कारवाई केलेली नाही.अनेक वेळा तक्रारी केल्या वृत्तपत्र मिडीयात बातम्या प्रसिध्द झाल्या शासनाने चौकशी केली मात्र त्यामध्ये कोण चोर कोण दोषी कोण आरोपी फरार याचा थांगपत्ता लागला नाही.पुरावे समोर असताना सरकार डॉ.मोहन नळदकर यांना वाचवण्यासाठी कोण राजकीय नेते वसुली वाझेना मदत करतात याकडे शासनाने लक्ष वेधावे अशी येथील शेतकऱ्याची मांगणी आहे. भिवंडी तालुक्यात समृध्दी महामार्ग वडनेरा महामार्ग गोडावुन एमआयडीसी झोन या विकास कामात भुसंपादीत होणाऱ्या जमिनीत डॉ।मोहन नळदकर सह अन्य अधिकाऱ्यानी आमाप संपत्ती जमा केली असल्याची चर्चा आहे. स्थानिक कुळवहिवाट कब्जादार शेतकऱ्याच्या विरोधात चुकीचे बनावट निर्णय देवुन जमिन श्रेत्राचे 7 12 उत्तारे वाढवुन कोटी रूपये कमविणारा डॉ.मोहन नळदकर यांनी शासनाच्या गुरचरण भुखंडावर कोटी रूपयाची दगडखाणीमधुन रॉयल्टी चोरी होताना का कारवाई केली नाही जर कारवाई केली असेल तर त्यातील गुन्हेगार फरार आहेत का ? रॉयल्टी दंड रक्कम किती जमा झाले. सरकारी भुखंड हाडप करून राजकीय शासकीय टोळीचा महाविकास अघाडी खडसे करणार की भाजपाचे किरीट सोमय्या यांच्या ईडी काडीचा बंदोबस्त करणार अशी उत्सुकता शेतकऱ्याना लागली आहे.

No comments

satta king