web-ads-yml-728x90

Breaking News

स्वातंञ्यात प्रथमच ठाणे जिल्हयाला मुख्यमंत्रीपद कुणबी समाज स्वर्गीय शांतारामभाऊ घोलपानंतर मंत्रीपदापासून उपेक्षितच;किसन कथोरे यांना मंत्रीमंडळात घ्यावं अन्यथा मुख्यमंत्री उपमुख्यमंञ्यावर नाराजी


BY - नामदेव शेलार,YML NEWS - मुरबाड,ठाणे

राजकारणात काय नेम काय गेम काय ठरवून कोणाला नरमून कधी पडदयामागून कधी सांगून समजावुन असं चालत असतं त्याकडे सामान्य जनतेचे लक्ष विचलित करून आपल्या मैत्रीचा धागा घट्ट असल्याचा कागावा करणारे भाष्य नेहमी सत्ता विरोधकाचं समोर येतं परंन्तू त्यापेक्षा माझ्या जिल्हयाला माझ्या तालुक्यात मतदार संघाला आपल्या समाजाला मंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा सर्वांची असते अशीच अपेक्षा ठाणे जिल्हयातील बहुसंख्याचे जनतेची एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन पुर्ण झाली आहे तशीच इच्छा ठाणे जिल्हा पालघर जिल्हयातील कुणबी समाजाची मुरबाडचे आमदार किसनराव कथोरे यांना करून पुर्ण करण्याची सुध्दबुध्दी भाजपाला मिळावी अशी अपेक्षा समाजबांधवानाच काय बहुजन समाजाला सुध्दा ठाणे पालघर जिल्हयात लागली आहे.

  ठाणे जिल्हयाला स्वर्गीय शांतारामभाऊ घोलप यांना महसुलमंत्री पद मिळाले होते त्यांनतर एकवेळा विरोधीपक्ष नेतेपद मिळाले होते त्यामुळे ठाणे जिल्हयाला मुख्यमंत्रीपद मिळावे अशी सर्वांची इच्छा होती अखेरर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळाल्याने ठाणे जिल्हयात जल्लोष होत आहे.

  राजकारणात नेत्यावर ग्रामपंचायती पासून सर्वच निवडणुकीत आपली सत्ता आणण्याचे आदेश असतात त्याच बळावर पक्षाचे मोठे पद मंत्रीपद दिलं जातं परंन्तु मुरबाडचे आमदार किसनराव कथोरे यांनी तेव्हाही राष्ट्रवादी काँगे्रसला सत्तादिली होती आजही भाजपाला सर्वत्र सत्तादिली ठाणे पालघर जिल्हयाची बांधणी केली आमदार खासदार दिले त्यांना दोन्ही पक्षानी मंत्रीपदासाठी टांगत ठेवले असे कसले राजकारण

किसन कथोरे यांना मंत्रीमंडळात घ्यावं अन्यथा मुख्यमंत्री उपमुख्यमंञ्यावर नाराजी

किती वेळा उत्सुक ठेवणार आजची संधी महत्वाची आहे.जेव्हा भाजपाचे सरकार बनलं नाही तेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षाची उमेदवारी देणारी भाजपा तेव्हा कुणबी नेते नाना पटोले यांच्या विरोधात किसन कथोरे यांना उमेदवारी दिली होती त्याची आठवण करून ठाणे पालघर साठी किसन कथोरे यांना मंत्री मंडळात घ्यावं अशी तमाम जनसामान्याची अपेक्षा आहे.

  भाजपा सेना सत्ता नाटय रंगतमय आहे जेव्हा शिवसेना भाजपा मध्ये तणाव झाला त्यावेळी शिवसेनेने पहिला मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना दयावं नंतर आडीच वर्षे भाजपाने मुख्यमंत्री घ्यावं अशी चर्चा होती मात्र झालं काय भाजपा बाजुला होऊन सेनेला राष्ट्रवादी काँगे्रस सोबत सरकार बनवावं लागलं आज काय घडलं शिवसेनेच्याच दोन नंबरच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणुन भाजपा सत्तेत येते मग उध्दवाच्या नेतृत्वाखाली का नको अशा राजकारण्यापासून खुप अनभुवाच्यासारख आहे परंन्तु निर्भिडता योग्य वेळी योग्य निर्णय होते या बद्दल शंका नाही.

   ठाणे जिल्हयात शिवसेनेचे गटाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यानाही युती म्हणुन मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांची मदत झाली आहे तसेच भाजपाचे खासदार कपील पाटील यांनाही निवडुण आणण्यासाठी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांची मदत झाली आहे.भावी सर्व निवडणुका नेतृत्व पक्ष उभारणीचा पाया किसन कथोरे असुन त्यांना आताच्या मंत्रीमंडळात स्थान म्हणजे एकनाथ शिंदे गट भाजपा पक्ष या दोघांचा फायदा आहे.

  ठाणे जिल्हयात राष्ट्रवादी काँगे्रस अन्य पक्षाना शह देणारं एकमेव नेतृत्व म्हणुन किसन कथोरे यांच्याकडे पाहिले जातयं त्याचं नांव मंत्रीमंडळाच्या पहिल्या यादीत येणे अपेक्षित आहे.त्याचा आनंद संपुर्ण ठाणे जिल्हयाला मुख्यमंत्री पदापेक्षा तमाम दोन्ही जिल्हयातील जनतेला मोठं वाटेल अशी चर्चा आहे.

  जसं आहे तसं मांडल आहे सत्य स्थितीला मान्यता हीच जनतेच्या विकासाची नांदी राजकारण कसं ठरवुन करवुन घडतयं त्यावर सोशल मिडीया मत व्यक्त करतयं परंन्तु भाजपाने ठाणे जिल्हयात किसन कथोरे यांना मंत्रीपद दयावं अशी तमाम भुमिपुत्राची समाज बहुजन समाजाची मांगणी आहे.

No comments