web-ads-yml-728x90

Breaking News

वरळी-शिवडी जोडरस्त्यासाठी वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करावे -पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइवमुंबई

मुंबईतील प्रवास वेगवान व्हावा, वाहतुकीची कोंडी कमी व्हावी यासाठी शासनाने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. वरळी शिवडी जोडरस्ता हा त्यातील एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. वरळी आणि शिवडी या दोन्ही बाजूकडे होणारी वाहतूक वरळीच्या जे के कपूर चौकाजवळून होणार असल्याने येथे अतिशय चांगल्या दर्जाचे वाहतूक व्यवस्थापन करावे, असे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले. वरळी-शिवडी जोडरस्ता दर्जेदार पद्धतीने आणि नियोजित वेळेत पूर्ण होण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. याच अनुषंगाने त्यांनी वरळीच्या जे के कपूर चौकात भेट दिली तसेच वाहतूक व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन पाहणी केली. यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवास, महानगरपालिकेचे उपायुक्त श्री.तळकर, सहायक आयुक्त शरद उघडे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.याचबरोबर श्री.ठाकरे यांनी कलानगर जंक्शन भागाला भेट देऊन येथील कामे मार्गी लावावीत तसेच येथील पादचारी पुलाची दुरुस्ती करावी, अशा सूचना केल्या. या परिसरातील वाहतूक व्यवस्थापन, सुशोभीकरण व सौंदर्यीकरणाच्या अनुषंगाने विविध पर्यायांवर त्यांनी श्रीनिवास यांच्यासमवेत चर्चा केली.

No comments